नवी दिल्ली -बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मायावतींच्या पक्षामध्ये पैसे घेऊन तिकीट दिले जाते असे त्यांनी म्हटले आहे.
video:बसपाच्या नेत्याचा गौप्यस्फोट 'मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते' - राजस्थान विधानसभा
बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
'आमच्या बहुजन समाज पक्षांमध्ये पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर कोणी जास्त पैसे दिले तर पहिले दिलेले तिकिट रद्द करून ते दुसऱ्याला दिले जाते. यात जर आणखी एखाद्या व्यक्तीने जास्त पैसे दिले तर ते तिकीट त्याला दिले जाते', असा गौप्यस्फोट राजस्थान विधानसभेत बहुजन समाज पक्षाचे आमदार राजेंद्र गुढा यांनी केला आहे.
बहुजन समाज पक्षावर या प्रकारचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. गेल्या वर्षी विधान परिषदचे माजी सदस्य मुकुल उपाध्याय यांनी बसपावर अलिगढमधून तिकीट देण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. मायवती यांनी त्यांच्याकडे 5 कोटी रुपये मागितल्याचे त्यांनी म्हटले होते.