बुलंदशहर- उत्तरप्रदेशातील बुलंदशहरात चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. २०१७ पासून पोलिसांना हवा असलेला एक गुन्हेगार स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. यावेळी त्याने सोबत दहा हजार रुपयेही आणले होते.
पोलिसांच्या भीतीने गुन्हेगाराने स्वत:हुन केले आत्मसमर्पण - आत्मसमर्पण
गुरुवारी एक गुन्हेगार १० हजार रुपयांच्या रकमेसह पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याच्यासोबत पोस्टर होते.
पोलिसांनी काही दिवसापूर्वी गुन्हेगाराविरुद्ध शोध अभियान राबवले होते. याची माहिती मिळताच अनिल नावाचा गुन्हेगार पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिलने यावेळी एक पोस्टर्सही सोबत आणले होते. त्यावर लिहिले होते, की पोलिसांच्या भीतीने मी आत्मसमर्पण करत आहे.
पोलीस अधीक्षक अतुल श्रीवात्सव यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले, की गुरुवारी एक गुन्हेगार १० हजार रुपयांच्या रकमेसह पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याच्यासोबत पोस्टर होते. पोलीस त्याचा २०१७ पासून शोध घेत होते. ठाण्यात हजर होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.