नवी दिल्ली - मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील तबरेज अन्सारी या बावीस वर्षीय तरुणाची जमावाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली होती. त्याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार असल्याची माहिती गुरुवारी वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिली आहे.
वक्फ मंडळ देणार तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी आणि पाच लाख रुपये
तबरेज अन्सारीच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार असल्याची माहिती गुरुवारी वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिली आहे.
तबरेज
मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून एका बावीस वर्षीय तरुणाला हल्लेखोरांनी वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. झारखंड येथील सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील धाटकीडीह गावात ही घटना घडली होती.
मारहाणी दरम्यान त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय बजरंगबली' असे म्हणायला सांगितले होते, अशी माहिती आहे.या घटनेनंतर तरबेजला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 22 जूनला त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Last Updated : Jun 28, 2019, 11:16 AM IST