LIVE UPDATES :
11:50 PM - रालोआ ३४३, संपुआ ८४, इतर १०० जागांवर विजयी
11:05 PM - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भव्य विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
10:55 PM - केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सत्ताधारी पक्षाला त्यांच्याविषयी देशात असलेल्या भावनांमुळे विजय मिळाला, असे म्हटले आहे. मात्र, केरळमध्ये जनमत त्यांच्या विरोधात होते. त्याचा काँग्रेसला फायदा झाला.
10:45 PM - सिंगापूरचे माजी पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
10:35 PM - बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जनतेचे आभार मानले. तसेच, त्यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
10:25 PM - इस्रायलयचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी मोदींचा विजय खूप मोठा असल्याचे सांगत आता त्यांना युतीची आवश्यकता नसल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी इस्रायलमधील निवडणुकांमधील विजयासाठी मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मोदींचे आभार मानले.
इस्रालयच्या पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा इस्रालयच्या पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा 10:15 PM - रालोआ ३३५, संपुआ ८२, इतर ८९ जागांवर विजयी.
9:30 PM - जोरदार आतषबाजी करत भाजपने केला विजय साजरा.
8:50 PM - रालोआ ३२३, संपुआ ७४, इतर ७० जागांवर विजयी.
7:15 PM - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मतदार संघातून विजयी.
7:00 PM - रालोआ २७९, संपुआ ६६, इतर ५३ जागांवर विजयी.
6:45 PM - दिल्लीत सर्वच्या सर्व जागांवर भाजप विजयी. हर्षवर्धन, गौतम गंभीर, मीनाक्षी लेखी, मनोजकुमार तिवारी, हंसराज हंस, रमेश बिधुरी, पर्वेश साहिब सिंह वर्मा हे आहेत विजयी उमेदवार.
6:30 PM - भोजपुरी अभिनेता आणि भाजप उमेदवार रविकिशन गोरखपूरमधून विजयी.
6:20 PM - बेगुसरायमधून कन्हैया कुमार पराभूत. भाजपच्या गिरीराज सिंहांनी जिंकला गड.
6:15 PM - प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.
6:10 PM - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना हरवून अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी विजयी. राहुल गांधींनी जनतेचा निर्णय मान्य असल्याची पत्रकार परिषदेत दिली प्रतिक्रिया.
6:05 PM - संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी.
6:00 PM - क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून विजयी.
5:55 PM - भाजपच्या मेनका गांधी सुल्तानपूरमधून विजयी.
5:50 PM - डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी यांचा तूतुकुडी मतदार संघातून विजयी.
5:45 PM - पश्चिम बंगामध्ये बाबुल सुप्रियो विजयी. भाजप समर्थकांना पश्चिम बंगालमध्ये जल्लोष
5:40 PM - अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
5:35 PM - पंतप्रधान मोदींनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. 'जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि प्रयत्नांबद्दल मी त्यांना सलाम करतो. त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचा विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवला,' असे ते म्हणाले.
5:30 PM - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
5:25 PM - बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
5:20 PM - बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
5:15 PM - व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन झुआन फुन्क यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
5:10 PM - मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळमधून विजयी.
5:05 PM - जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला श्रीनगरमधून विजयी
5:00 PM - बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मीमी चक्रवर्ती जादवपूरमधून विजयी.
4:55 PM - हेमा मालिनी मथुरेतून विजयी.
4:50 PM - अपक्ष नेत्या सुमनलता अंबरीश यांचा कर्नाटकांतील मंड्या मतदार संघातून विजय. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखील कुमारस्वामी यांना केले पराभूत.
4:45 PM - भाजपचे जयपूरमधून (ग्रामीण) राजवर्धनसिंग राठोड विजयी.
4:40 PM - भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून विजयी.
4:35 PM - शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांचा फिरोजपूरमधून विजय
4:30 PM - गुणा येथून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया पराभूत.
4:25 PM - केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह लखनौमधून विजयी.
4:20 PM - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा केरळातील वायनाड मतदार संघात मोठा विजय. ८ लाख ३८ हजार ३७१ मतांच्या फरकाने झाले विजयी.
4:15 PM - गुरदासपूर येथून अभिनेते आणि भाजपचे उमेदवार सनी देओल विजयी.
4:10 PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून विजयी.
4:05 PM - राहुल गांधी वायनामध्ये ७ लाख ९० हजार मतांनी आघाडीवर
3:55 PM - माजी पंतप्रधान देवेगौडा हासन मतदार संघातून पराभूत.
3:45 PM - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना गुलबर्गा मतदार संघातून पराभवाचा धक्का.
3:35 PM - शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर बादल भटिंडा मतदार संघातून आघाडीवर आहेत.
3:30 PM - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजयाच्या मार्गावर असलेल्या पंतप्रधान मोदींना आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना शुभे्च्छा दिल्या आहेत. 'भाजप प्रथमच ३०० च्या आकड्याजवळ पोहोचत आहे. तर, रालोआ ३५० च्या आकड्याला स्पर्श करत आहे,' असे ते म्हणाले.
3:25 PM - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
3:20 PM - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा कौल मान्य करत असल्याचे म्हटले आहे. 'मी जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र, लोकांना ईव्हीएमविषयी शंका होत्या. काँग्रेसने राजीव गांधींच्या काळात खूप चांगली कामगिरी केली. मात्र, त्या वेळी कोणीही मतदान प्रक्रियेवर संशय उपस्थित केला नाही. हीच गोष्ट अटल बिहारी वाजपेयी जिंकले, तेव्हाही घडली.
3:15 PM - अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गणी यांनी ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या. तसेच, अफगाणिस्तान भारतासोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
3:10 PM - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सी. जे. छावडा यांच्या तुलनेत ५ लाख ११ हजार १८० मतांनी आघाडीवर
3:05 PM - भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मोदींना शुभेच्छा दिल्या.
3:00 PM - रालोआ (भाजप युती) ७६, संपुआ (काँग्रेस आघाडी) १०, इतर ११ जागांवर विजयी झाले आहेत.
2:55 PM - रालोआ (भाजप युती) २७१, संपुआ (काँग्रेस आघाडी) ७८, इतर ९६ जागांवर आघाडीवर.
2:50 PM - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जबरदस्त विजय मिळवण्याच्या मार्गावर असलेल्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
2:45 PM - 'सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत,' असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
2:40 PM - जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्याही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा.
2:35 PM - चीनचे अध्यक्ष यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या.
2:30 PM - तेलंगणामध्ये टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) ८ जागांवर आघाडीवर. केसीआर यांच्या कन्या के. कविता मात्र, पिछाडीवर.
2:15 PM -भाजपचे गजेंद्रसिंह शेखावत जोधपूरमधून विजयी
2:10 PM - भाजपचे अनंतकुमार हेडगे उत्तराखंडमधून विजयी.
2:05 PM - अमेठीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात स्मृती इराणी ११ हजार २२६ मतांनी आघाडीवर.
2:00 PM - काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात भाजपचे रवि शंकर प्रसाद १ लाख ४४ हजार २४९ मतांनी आघाडीवर
1:45 PM - लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल आघाडीवर
1:35 PM - भाजपचे वरुण गांधी पिलिभीत येथून विजयी
1:25 PM - तेलंगणाचे मुख्यंमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता निझामाबाद मतदार संघातून पिछाडीवर पडल्या आहेत. भाजप उमेदवार धर्मापुरी अरविंद या जागेवर ३१ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
1:15 PM - सध्या भाजपला अधिकाधिक जागांवर मोठी आघाडी मिळत आहे. लोकसभेचा रणसंग्राम काहीसा एकतर्फी होत चालल्याचा चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या जवळ पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, यापुढेही भारताशी द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील, असे दोन्ही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
1:40 PM - पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बाबुल सुप्रियो आसनसोल मतदार संघात आघाडीवर आहेत.
1:30 PM - भाजपचे अनुराग सिंह ठाकूर हरमीरपूर विजयी.
1:20 PM - भाजपचे जयंत सिन्हा हजारीबागमधून विजयी.
1:10 PM - डीएमकेचे दयानिधी मारन चेन्नई सेंट्रलमधून विजयी.
1:05 PM - भाजपचे जितेंद्र सिंह उधमपूरमधून विजयी
1:00 PM - भाजपचे मनोज कुमार तिवारी यांचा ईशान्य दिल्लीतून विजय.
12:55 PM - हरसिम्रत कौर बादल भटिंडा येथून विजयी.
12:50 PM - रविशंकर प्रसाद पाटणा साहिबमधून विजयी
12:45 PM - पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अर्जुन सिंह बराकपूर येथे आघाडीवर आहेत. तर, टीएमसीचे मीमी चक्रवर्ती जादवपूर येथे आघाडीवर आहेत.
12:35 PM - रालोआला राजस्थानात ५, कर्नाटकात ३, गुजरातमध्ये १ जागेवर विजय.
12:25 PM - रालोआचे (NDA) ११ उमेदवार विजयी.
12:15 PM - भाजपच्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी येथील समर्थकांनी भाजप आघाडीवर असल्याच्या आनंदात जल्लोष केला.
12:10 PM - ओडिशात १५ जागांवर बिजू जनता दल आणि ६ जागांवर भाजपने आघाडी घेतली असून २१ पैकी सर्वच्या सर्व जागांवर रालोआची आघाडी आहे.
12:05 PM - ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हैदराबाद लोकसभा मतदार संघातून ८५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
12:00 PM - महाराष्ट्रात माजी गृहमंत्री काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे सोलापूर मतादार संघात पिछाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे बारामतीमधून आघाडीवर आहेत.
11:55 AM - ओडिशात १५ जागांवर बिजू जनता दल आणि ६ जागांवर भाजपने आघाडी घेतली असून २१ पैकी सर्वच्या सर्व जागांवर रालोआची आघाडी आहे.
11:50 AM - शरद पवार यांनी ऐनवेळी दिल्लीचा कार्यक्रम बदलला. ते आज मतमोजणीच्या दिवशी दिल्लीत उपस्थित राहून विविध पक्षांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार होते. दुपारनंतर देशभरात परिस्थिती काय असेल, यांचा अंदाज घेऊनच पवार दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.
11:45 AM - 'माझाच विजय होईल. माझ्या विजयासह धर्माचा विजय होईल. अधर्माचा नाश होईल. मी भोपाळच्या जनतेचे आभार मानते,' असे भापोळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.
11:40 AM - ओडिशातील पूरीमधून भाजप नेते संबित पात्रा ७०० मतांनी आघाडीवर.
11:35 AM - भाजपच्या स्मृती इराणींना अमेठीतून ७ हजार ६०० मतांची आघाडी.
11:30 AM - भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविली.
11:25 AM - भाजप ३३३, काँग्रेस ८७, इतर १२२ जागांवर आघाडीवर
11:20 AM - काँग्रेसचे शशी थरूर केरळातील तिरुवनंतपुरम मतदार संघातून १३ हजार मतांनी आघाडीवर
11:15 AM - तमीळनाडूमध्ये डीएमकेला ३५, इतरला १ जागेवर आघाडी.
11:10 AM - राजस्थानमध्ये सर्व २५ जागांवर आणि गुजरातमध्ये सर्व २६ जागांवर भाजपला आघाडी.
11:05 AM - बिहारमध्ये रालोआ ३८, संपुआ २ जागांवर आघाडीवर
11:00 AM - उत्तर प्रदेश भाजप ५३, सप १०, बसप १६, काँग्रेस १ जागेवर आघाडीवर.
10:55 AM - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २६, भाजप १५ जागांवर आघाडीवर
10:55 AM - मध्य प्रदेशात भाजप २८, काँग्रेस १ जागेवर आघाडीवर.
10:50 AM - भाजप-शिवसेना मुंबईत सर्वच्या सर्व सहा मतदार संघांत आघाडीवर
10:50 AM - हासन मतदार संघात देवेगौडा पिछाडीवर.
10:45 AM - छत्तीसगडमध्ये एकूण ११ जागांपैकी भाजप ९ जागांवर, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
10:40 AM - जेडीएस नेते निखिल कुमारस्वामी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुमनलता अंबरीश १२०० मतांनी आघाडीवर
10:35 AM - नॅशनल कॉन्फरन्स अनंतनाग मतदार संघात आघाडीवर, मेहबूबा मुफ्ती तिसऱ्या स्थानावर
10:30 AM - भाजप दिल्लीतील सर्वच्या सर्व सातही जागांवर आघाडीवर.
10:25 AM - राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड जयपूर (ग्रामीण) मतदारसंघातून आघाडीवर.
10:20 AM - राजस्थानमध्ये काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह बामनेरमधून पिछाडीवर.
10:15 AM - पंजाबमध्ये काँग्रेस ८ जागांवर, भाजप आणि शिरोमणी अकाली दल प्रत्येकी २ जागांवर आणि आप १ जागेवर आघाडीवर
10:10 AM - पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसीतून २० हजार मतांनी आघाडीवर. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजरातमधील गांधीनगरातून ५० हजार मतांनी आघाडीवर.
10:05 AM - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम याचे पुत्र कार्ती चिदंबरम शिवगंगाई मतदार संघातून आघाडीवर
10:00 AM - तृणमूल काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर मतदार संघातून आघाडीवर
9:55 AM - भाजपच्या मेनका गांधी सुल्तानपूरमधून पिछाडीवर. त्यांचे पुत्र वरुण गांधी पिलिभीत येथून आघाडीवर.
9:55 AM - जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आघाडीवर
9:50 AM - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी कर्नाटकातील मंड्या मतदार संघातून आघाडीवर
9:45 AM - पाटणा साहिब येथून भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडीवर. त्यांच्या विरोधात नुकताच काँग्रेस प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा लढत आहेत.
9:40 AM - भाजप २९६, काँग्रेस ७७, इतर ९३ जागांवर आघाडीवर
9:35 AM - मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा मतदार संघातून पिछाडीवर
9:30 AM - उत्तर प्रदेशातील मैनपुरी मतदार संघातून मुलायमसिंह यादव, मिर्झापूर येथून अनुप्रिया पटेल आघाडीवर
9:25 AM - भाजप २५९, काँग्रेस ७७, इतर ६९ जागांवर आघाडीवर
9:20 AM - बिहारमधील बेगुसराय येथून भाकपचा युवा नेता कन्हैया कुमार पिछाडीवर तर, भाजप नेते गिरीराज सिंह आघाडीवर
9:15 AM - राहुल गांधी केरळातील वायनाड येथून १६ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर
9:10 AM - मध्य प्रदेशात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह भोपाळमधून, गुणा येथून ज्योतिरादित्य सिंधिया, जबलपूरमधून विवेक टांखा पिछाडीवर
9:05 AM - भाजपचे सनी देवोल गुरदासपूरमधून, काँग्रेसचे मनीष तिवारी आनंदपूर साहिबमधून, गुरजीत सिंह औजला अमृतसरमधून, अकाली दलाच्या हरसिम्रत कौर बादल भटिंडामधून आघाडीवर
9:00 AM - भाजपचे रमेश बिधुरी दक्षिण दिल्लीतून आणि पर्वेश वर्मा पश्चिम दिल्लीतून आघाडीवर
8:55 AM - वाराणसीतून नरेंद्र मोदी, रायबरेलीतून सोनिया गांधी आघाडीवर
8:50 AM - भोपाळमधून भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आघाडीवर, हिमाचल प्रदेशातील हारमीरपूर येथून भाजप उमेदवार अनुराग ठाकूर आघाडीवर.
8:45 AM - लखनौमधून राजनाथ सिंह आघाडीवर
8:40 AM - आझमगड येथून अखिलेश यादव आघाडीवर
8:35 AM - अमेठीमधून स्मृती इराणी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर
8:30 AM - भाजपची 57 जागांवर, काँग्रेसची 20 जागांवर, इतर 12 जागांवर आघाडीवर
8:15 AM - भाजपची 8 जागांवर तर, काँग्रेसची 4 जागांवर आघाडी
8:00 AM - मतमोजणीला सुरुवात.
7:40 AM - मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी केरळातील वायनाड मतदारसंघातील मतमोजणी केंद्राबाहेरचे दृश्य. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीसह वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला होता. यामुळे येथील निकालही महत्त्वाचा ठरणार आहे.
7:15 AM - मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था. पंजाबमधील जालंधर येथील दृश्य.
नवी दिल्ली -लोकशाहीच्या उत्सवातील सर्वात महत्वाचा भाग म्हणून मतमोजणीकडे पाहिले जाते. पंतप्रधान कोण होणार हे देशभरात होणाऱया मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. यासाठीची प्रतिक्षा आता संपली असून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघात आज आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून मतमोजणीसाठी विविध राज्यांतील सनदी अधिकारी विविध राज्यांतून नेमण्यात आले आहेत. यावर्षी अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकित ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटबद्दल विरोधी पक्षांनी शंका घेतली होती. सत्ताधारी पक्ष आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करु शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर मतमोजणी केंद्राच्या बाहेर ठिय्या मांडला आहे. गैरप्रकार घडल्यास तत्परतेने पावले उचलता यावीत यासाठी ते तयार आहेत. दुसरीकडे ईव्हीएमचे रक्षण करण्यासाठी गरज पडल्यास प्रसंगी हत्यारही उचलू असे वक्तव्य राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी केले होते. जर ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास स्थिती खराब होईल. रस्त्यावर रक्त सांडेल, असेही कुशवाहा म्हणाले होते. अशा परिस्थितीचा विचार करता मतमोजणी दरम्यान हिंसा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांनी ईव्हीएमसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. ही मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस यांच्या २२ नेत्यांनी केली. या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. या बैठकीस निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतमोजणीस दोन ते तीन दिवसांचा अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.