मुंबई - लोकसभेमध्ये मंगळवारी काश्मीर पुनर्चना विधेयक पारित झाले. त्यावेळी लोकसभेमध्ये विरोधक आणि सरकारमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही लोकसभेत भाषण केले. त्यांचा भाषणाचा काही अंश इस्लामाबादमध्ये पोस्टर स्वरुपात झळकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आज पंतप्रधान मोदींनी काश्मीर घेतले, उद्या ते पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेतील. मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे. तसेच हे पोस्टर इस्लामाबादमधील रस्त्यांवर लागल्याचे बोलले जात आहे.
VIRAL VIDEO: शिवसेना खासदार संजय राऊतांचे पोस्टर इस्लामाबादमध्ये झळकले - संजय राऊत पोस्टर
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही लोकसभेत भाषण केले. त्यांचा भाषणाचा काही अंश इस्लामाबादमध्ये पोस्टर स्वरुपात झळकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊतांचे पोस्टर इस्लामाबादमध्ये झळकले
महा'भारत' स्टेप फॉरर्वड अशा शीर्षकाखाली हे पोस्टर लावण्यात आले आहे. एका तरुणाने या पोस्टरचा व्हिडिओ काढला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देशविरोधी फलक लागल्याने देशामध्ये काय चालू आहे, असा प्रश्न या तरुणाने विचारला आहे. मात्र, हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, या बाबत स्पष्टता नाही.
Last Updated : Aug 7, 2019, 5:30 PM IST