नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेकांची लग्ने पुढे ढकलली आहेत. कोरोना संकटामुळे लग्न ठरलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले. मात्र, मध्य प्रदेशमधील धार येथए एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. वधू-वर यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
एक विवाह असाही.. वधू-वर मास्क घालून लग्न मंडपात, काठ्याच्या मदतीने घातल्या वरमाला
मध्य प्रदेशमधील धार येथ एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. वधू-वर यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
धार जिल्ह्यातील कुक्षी येथील टेकी गावामध्ये एक लॉकडाऊच्या काळातही लग्न लागले आहे. गावातील भारती मंडलोई यांनी पशूवैद्यक असलेले राजेश निगम यांच्याबरोबर लग्न केले आहे. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी एकमेंकाना लाकडी काठ्याच्या मदतीने वरमाला घातल्या. लग्नाच्या ठिकाणी सर्वांना सॅनिटाईझ करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्यास सांगण्यात आले. या अनोख्या लग्नाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह समारंभ, रखडले आहेत. तर काहींनी मोजक्या लोकांना बोलावून विवाह संपन्न केला आहे. देशभर पसरलेल्या कोरोना संकटावर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्न लागली असून सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले आहे.