कोलकाता- पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यात 'जय श्रीराम'चे नारे दिल्यामुळे भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत तिघेजण जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम'चे नारे दिल्यामुळे भडकली हिंसा; ३ जखमी
तृणमूलचे नेते मदन मित्रा आणि ज्योतिप्रिय मलिक एका स्थानिक नेत्याकडे बैठकीसाठी जात होते. यादरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'चे नारे देण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्दवान जिल्ह्यातील कंचारापारा गावात तृणमूलचे नेते मदन मित्रा आणि ज्योतिप्रिय मलिक एका स्थानिक नेत्याकडे बैठकीसाठी जात होते. यादरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'चे नारे देण्यास सुरुवात केली. यानंतर तृणमूलचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली.
भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे, की पोलीस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत हाणामारी केली. या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर, भाजप कार्यकर्त्यांनी कंचारापार रेल्वे स्टेशनवर ठिय्या मांडला. पोलिसांनी कारवाई करत १५ मिनिटात कार्यकर्त्यांना हटवत रेल्वेसेवा पूर्ववत केली.