नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. २२ आमदारांनी राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकारवर संकट आले आहे. अशातच भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने त्यांचे बहुमत गमावले असून, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विनय सहस्रबुद्धे यांनी केली.
काँग्रेसने बहुमत गमावले, कमलनाथांनी राजीनामा द्यावा - विनय सहस्रबुद्धे - मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमत गमावले
भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने त्यांचे बहुमत गमावले असून, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विनय सहस्रबुद्धे यांनी केली.
आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसला त्यांचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे कमलनाथ यांची कसोटी लागणार आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
काँग्रेसला स्वत: ला त्यांचे घर सांभाळता येत नाही आणि ते भाजपवर टीका करत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाने हे सिद्ध झाल्याचे विनय सहस्रबुद्धे म्हणाले.