चेन्नई -तामिळनाडूमधील धर्मापुरी जिल्ह्यातील अन्नासागरम गावामध्ये सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी आजही जुन्या काळातील पद्धतीचा वापर केला जातो. सूर्यग्रहण सुरू होते त्यावेळी मुसळ उखळामध्ये उभे ठेवले जाते. कुठलाही आधार न घेता मुसळ उभे राहते. त्यावेळी सूर्यग्रहण सुरू झाले, असे समजले जाते. सूर्यग्रहण संपल्यानंतर मुसळ लगेच खाली पडते.
तामिळनाडूमध्ये मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज, जुन्या काळात केला जायचा वापर - अन्नासागरम तमिळनाडू
जुन्या काळात सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी काही मोजक्या पद्धतींचा वापर केला जात होता. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे आता सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही तमिळनाडूमधील अन्नासागरम या गावामध्ये मुसळ उखळामध्ये उभे ठेऊन सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला जातो.
जुन्या काळात सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी काही मोजक्या पद्धतींचा वापर केला जात होता. मात्र, आता तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे आता सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही अन्नासागरम या गावामध्ये मुसळ उखळामध्ये उभे ठेवून सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला जातो. आज सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू झाले आणि सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी संपले. यावेळी अन्नासागरम येथील ग्रामस्थांनी या पद्धतीचाच वापर करून सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला.
उखळाचा पृष्ठभाग सपाट असल्याने त्यामध्ये कुठलाही आधार न घेता मुसळ उभे राहण्याची शक्यता नाही. मात्र, सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर मुसळ उभे राहत असल्याचे गावकरी सांगतात.