महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 22, 2019, 8:32 PM IST

ETV Bharat / bharat

इथे मृत्यूही ओशाळला; ...म्हणून त्यांनी पुलावरून २० फूट खाली नदीत उतरवला मृतदेह

या पुलाला लागूनच, सवर्ण जातीतील काही लोकांची शेतजमीन आहे. ती शेतजमीन ओलांडून पुढे गेल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही. आणि आपल्या शेतजमीनीजवळून अनुसुचित जातीतील लोकांनी जाऊ नये, असे सवर्ण जातीतील काही लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे, त्यांनी पुलावरच प्रेतयात्रा थांबवली.

vellore schedule caste news

चेन्नई- वेल्लोरमधील वानियमपाडीजवळ असलेल्या नारायणपूरम मध्ये राहणाऱ्या अनुसुचित जातीतील लोकांना बऱ्याच सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आजही अशीच एक घटना घडली. अनुसुचित जातीतील एका व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच, वरच्या जातीतील काही लोकांनी प्रेतयात्रा थांबवली आणि लोकांना पुलावरून जाण्यापासून अडवले.

वेल्लोर : पुलावरून २० फूट खाली नदीत उतरवला मृतदेह, वाचा काय आहे प्रकरण...

या पुलाला लागूनच, सवर्ण जातीतील काही लोकांची शेतजमीन आहे. ती शेतजमीन ओलांडून पुढे गेल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही आणि आपल्या शेतजमीनीजवळून अनुसुचित जातीतील लोकांनी जाऊ नये, असे त्या जमीन मालकांचे म्हणणे होते. त्यामुळे, त्यांनी पुलावरच अंत्ययात्रा थांबवली.

यानंतर बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर, अनुसुचित जातीतील लोकांनी मृतदेहाला दोरीने बांधून, २० फूट खोल नदी पात्राच्या काठावर उतरवले. त्यानंतर, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर, अनुसुचित जातीतील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, आपल्याला वेगळी स्मशानभूमी देण्याची मागणी केली.

याआधीही जिल्हाधिकाऱ्यांना, जागेचा अभाव असल्याने स्मशानभूमीचा विस्तार करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details