महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आपण संजय गांधींचे पुत्र, 'त्यांच्या' हातून जोड्यांची लेस खोलून घेतो' - Lok sabha Polls

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत.

Varun Gandhi

By

Published : May 4, 2019, 9:15 PM IST

Updated : May 4, 2019, 10:01 PM IST

लखनौ -मी संजय गांधी यांचा पुत्र आहे आणि बसपच्या कोणत्याही नेत्याला घाबरत नाही. उलट त्यांच्या हातून जोड्यांची लेस बांधून घेतो, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते वरुण गांधी यांनी केले आहे. गुरुवारी सुल्तानपूर येथे एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. असे वक्तव्य करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.


लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत. अशात मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधीही प्रचाराला लागले आहेत. त्यांच्या प्रचाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते विरोधकांवर अत्यंत प्रक्षोभक भाषेत टीका करताना दिसतात.


मी एक गोष्ट जनतेला समजावून सांगतो. येथे कोणालाही भिण्याची गरज नाही. मी येथे उभा आहे. मी संजय गांधीचा मुलगा आहे. मी त्या लोकांकडून आपले जोड्यांची लेस खोलून घेतो, असे वक्तव्य त्यांनी केले.

वरुन गांधींचा व्हिडिओ
वरुण गांधी हे सुल्तानपूर येथून खासदार आहेत. मात्र, यावेळी त्यांची जागा बदलण्यात आली आहे. सुल्तानपूरच्या जागी त्यांना आता पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. तर, येथून त्यांची आई मेनका गांधी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, आईच्या प्रचारासाठी ते सुल्तानपूर येथे आले होते.


सुल्तानपूर येथून बसपच्या तिकिटावर चंद्र भद्र सिंह निवडणूक लढत आहेत. त्यांना सोनू या नावाने ओळखले जाते. तर त्यांच्या भावाचे नाव मोनू आहे. त्यांनाच निशाण्यावर घेत गांधी यांनी हे वक्तव्य केले.

Last Updated : May 4, 2019, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details