लखनऊ(वाराणसी) -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्ण नसल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील धार्मिक केंद्र असलेल्या वाराणसीमध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.
३ मे पर्यंत वाराणसीत होणार लॉकडाऊनचे काटेकोर पालन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
बुधवारी वाराणसी महानगरपालिकेच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ज्या भागातून हे रुग्ण सापडले तो परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे. आत्तापर्यंत वाराणसी शहरात १६ ठिकाण कोरोना हॉटस्पॉट घोषित केली आहेत. वाराणसीमध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.
वाराणसी
३ मे पर्यंत वाराणसीमध्ये लॉकडाऊन पाळला जात आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा घरपोहच पुरवठा केला जात आहे. फक्त आरोग्यविषयक कारणांसाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
बुधवारी वाराणसी महानगरपालिकेच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ज्या भागातून हे रुग्ण सापडले तो परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे. आत्तापर्यंत वाराणसी शहरात १६ ठिकाण कोरोना हॉटस्पॉट घोषित केली आहेत.