वाराणसी- हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या काशी शहरास विद्वानांची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. मात्र, कोरोनाच्या काळात येथील धार्मिक विधीवर निर्बध आले आहेत. लॉकडाऊनचा फटका ज्या प्रमाणे छोट्या मोठ्या व्यावसायिाकांना बसला आहे. तसाच फटका येथील ब्राम्हणांनाही बसला आहे. येथील ब्राम्हण समुदाय सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र, धार्मिक विधी करून जगणाऱ्या या समुदायाकडे सराकारचे लक्ष नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
कोरोना महामारीमुळे काशीमधील सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. सरकारने कोरोनाच्या नियमावलीचे पालन मंदिर आणि मठ सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या भीतीने भक्तांचा येणार ओघ अद्यापही तुरळकच आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक घरामध्ये पूजा पाठ करण्यासही पुढाकार घेताना दिसून येत नाहीत. या पूजा अर्चनेवरच काशीतील ब्राम्हणांचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, सध्य स्थितीत पूजापाठ बंद असल्याने गरीब ब्राम्हणवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
एकवेळच्या जेवणावरच जातो दिवस-
कोरोना काळात सुरू असलेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही कसेतरी दिवस पुढे ढकलत आहोत. सध्या केवळ एकवेळचे जेवण करण्याची वेळ आली आहे. आता कोरोना काळात आमचा कमवण्याचा काळ निघून गेला आहे. तसेच यंदा काही कमाई झाली नसल्यामुळे जवळचा पैसाही संपला आहे. त्यामुळे सध्या हलाकीचे जीवन जगण्याची वेळ आली असल्याची खंत ब्राम्हणांनी व्यक्त केली आहे