चामोली -उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते मार्ग बंद आहेत. त्यामुळे स्थानिकांना बाहेर पडणं कठीण झालं आहे. रस्ता बंद असल्यामुळे एका नवरदेवाला चक्क पायी चालत मंडप गाठावा लागला आहे.
बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद असल्याने नवरदेव पायी आले मंडपात उत्तराखंडमधील चामोली येथे बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. एकिकडे रस्ते बंद आहेत. तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त जवळ येत असल्याने नवऱ्या मुलाची घालमेल झाली. मग काय नवरदेव थेट पायी मंडपात जाण्यासाठी निघाले. नवरदेवाने चक्क 4 किलोमीटर पायी चालत मंडप गाठला आहे. वाहतूक सुरळीत होण्याची वाट न पाहता चालत निघालेला वर अखेर वेळेत आपल्या वधूला आणण्यासाठी मांडवात पोहोचला.
नवरदेवाला चक्क पायी चालत मंडप गाठावा लागला. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या हिमवृष्टीमुळे औली, मुक्तेश्वरसह उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी आलेले अनेकजण अडकून पडले आहेत. उत्तराखंडमध्ये झालेल्या या हिमवृष्टीने उत्तर हिंदुस्थानातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.