महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एकट्या उत्तरप्रदेशचे तब्बल ६ राज्यपाल, यूपीमध्ये मात्र गुजराती राज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांच्या नेमणूका केल्या आहेत. त्यातील एकट्या उत्तरप्रदेशचे ६ राज्यपाल आहेत.

राजभवन

By

Published : Jul 21, 2019, 6:35 PM IST

लखनौ -नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांच्या नेमणूका केल्या. यानंतर आता राष्ट्रपतींसहीत ६ राज्यपाल उत्तरप्रदेश राज्याचे असून राज्याने राजभवनात आपला दबादबा कायम ठेवला आहे.

राजभवन

भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते फागुसिंह चौहान यांना बिहार राज्याची जबाबदारी दिली आहे. भाजपचे पूर्व केंद्रीयमंत्री कलराज मिश्रा यांच्याकडे हिमाचल प्रदेश, कल्याणसिंह यांच्याकडे राजस्थान, बेबी रानी मौर्य यांच्याकडे उत्तराखंड, केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे पश्चिम बंगाल, सत्यपाल मलीक यांच्याकडे जम्मू कश्मीर तर, लालजी टंडन यांच्याकडे मध्यप्रदेश राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली आहे. अशाप्रकारे उत्तरप्रदेशचे ६ राज्यपाल आहेत. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे उत्तरप्रदेशच्या राज्यपाल म्हणून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details