महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2020, 7:53 AM IST

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये उत्तर प्रदेशच्या सीआरपीएफ जवानाला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

39 वर्षीय वर्मा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 4 मार्च 2003 ला सेवा सुरु केली होती. ते जम्मू काश्मीरमध्ये एक वर्षापासून हेड कॉन्सेटबल या पदावर काम करत होते.दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. ते उत्तर प्रदेशातील सिकर जिल्ह्यातील होते.

Martyr Deep Chand Verma
हुतात्मा दिप चंद वर्मा

सिकर(उत्तरप्रदेश)- केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान दिप चंद वर्मा याला बुधवारी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये मशिदीमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. दिप चंद वर्मा हे उत्तर प्रदेशातील सिकर जिल्ह्यातील होते.

भारतीय सेनादलाच्या वतीने दिप चंद वर्मा यांना वीरमरण आल्याचे जाहीर करण्यात आले. यांनतर वर्मा मुळगावातील नागरिकांनी वर्मा यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल अभिवादन केले.

39 वर्षीय वर्मा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 4 मार्च 2003 ला सेवा सुरु केली होती. ते जम्मू काश्मीरमध्ये एक वर्षापासून हेड कॉन्सेटबल या पदावर काम करत होते.

केंद्रीय राखीव पोलीस दलाने सांगितल्याप्रमाणे , सीआरपीएफची 179 बटालियन सोपोरमधील मॉडेल टाऊन चौक परिसरात पेट्रोलिंग करत होती. यानंतर बटालियन मधील जवांनानी मशिदीमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी विविध गट केले आणि ते मशिदीजवळ गेले. यावेळी मशिदीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये सीआरपीएफचे जवान भोया राजेश, हेड कॉन्स्टेबल दिप चंद वर्मा, निलेश चावडे, दिपक पाटील जखमी झाले. यानंतर जखमी झालेल्या दिप चंद वर्मा यांचा मृत्यू झाला. वर्मा यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details