महाराष्ट्र

maharashtra

'चीनविरुद्धच्या वादामध्ये अमेरिका भारतासोबत'

By

Published : Jun 13, 2020, 12:53 PM IST

अमेरिका भारतासोबत असून चीनचे सर्व डावपेच उलथून लावण्याबाबत अमेरिका भारताला मदत करेल. भारत आणि अमेरिकेचे संबंध हे मैत्रीचे आहेत. चीनकडून भारत आणि चीनच्या लडाख येथील नियंत्रण रेषेवर विविध प्रकारचे हल्ले आणि हालचाली होत आहे. या पार्श्वभूमीवर वेल्स यांनी हे ट्वीट केले आहे.

Alice Wells
अलाईस जी. वेल्स

वॉशिंग्टन (अमेरिका)- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे माजी प्रधान उपसचिव (पीडीएएस) अलाईस जी. वेल्स यांनी शुक्रवारी ट्वीट करून सांगितेल की, चीनकडून सतत भारताच्या सार्वभौमत्त्वावर घाला घातला जात आहे. याप्रकरणी अमेरिका भारतासोबत असून चीनचे सर्व डावपेच उलथून लावण्याबाबत अमेरिका भारताला मदत करेल. भारत आणि अमेरिकेचे संबंध हे मैत्रीचे आहेत. चीनकडून भारत आणि चीनच्या लडाख येथील नियंत्रण रेषेवर विविध प्रकारचे हल्ले आणि हालचाली होत आहे. या पार्श्वभूमीवर वेल्स यांनी हे ट्वीट केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून सांगितले की, 'दोन आशियाई देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी अमेरिका तयार आहे.' तर, भारत आणि चीनमध्ये बोलणी झाली आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून 6 जूनला चर्चा झाली. ज्यामध्ये भारताकडून मुख्य लेफ्ननंट जनरल हरिंदर सिंह आणि चीनकडून माज लिऊ लिन यांचा मुख्य सहभाग होता.

ABOUT THE AUTHOR

...view details