मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'
'माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ध्येयासाठी काम करण्याऐवजी क्षुद्र अंतर्गत राजकारण आणि संघर्ष सुरू आहेत. यामध्ये माझा वापर करून घेतला जात आहे,' असे उर्मिला यांनी म्हटले आहे. या कारणाने मी राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता
Last Updated : Sep 10, 2019, 4:33 PM IST