नवी दिल्ली -काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत उत्तर प्रदेशमधील महिलाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. 'एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्हे कमी होत नाही आहेत. तर दुसरीकडे कायद्याचे रक्षणकर्ते पोलीस महिलांसोबत गैरवर्तवणूक करत आहेत', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
video: छेडछाडीची तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत पोलिसांची गैरवर्तवणूक, पोलीस निलंबीत - प्रियंका गांधी
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत उत्तर प्रदेशमधील महिलाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

प्रियंका गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी ठाण्यात छेडछाडीची तक्रार करण्यासाठी आलेली आहे. तिच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्या तरुणीसोबत गैरवर्तवणूक करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. संबधीत पोलिसाला निलंबीत करण्यात आले आहे.
'एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्हे कमी होत नाही आहेत. तर दुसरीकडे पोलिसांची महिलासोबतच गैरवर्तवणूक पाहायला मिळत आहे. महिलांना न्याय देण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही पहिली पायरी आहे', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.