लखनऊ - काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब' येऊन पडला आहे. हे पत्र उत्तर प्रदेशातून आले आहे. मागील वर्षी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नऊ वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये पक्ष केवळ 'इतिहास'चा भाग बनून राहण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे यात सुचवण्यात आले आहे. परिवाराच्या मोहातून बाहेर येण्याचा सल्लाही यामध्ये देण्यात आला आहे.
या पत्रातून उत्तर प्रदेशाच्या प्रभारी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या चार पानांच्या पत्रात सोनिया गांधी यांना स्वकुटुंबाच्या मोहातून बाहेर पडण्याचा आणि त्याच्या पलीजाऊन पक्षाच्या विचार करण्याचा आग्रह केला आहे. कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडून पक्षाच्या लोकशाहीपूर्ण परंपरांना पुनर्स्थापित करावे, असे या पत्रात लिहिले आहे.
माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी विधायक विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांच्या सह्यांचे हे पत्र असून यामध्ये काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्वांत वाईट काळातून जात असल्याचे म्हटले आहे.
'तुम्हाला राज्यांच्या बाबतीत प्रभारींकडून सद्यस्थितीची माहिती दिली जात नाही. आम्ही जवळजवळ एका वर्षापूर्वीपासून तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत होतो. मात्र, आम्हाला ती मिळत नव्हती. आमची हकालपट्टी अवैध होती. त्याविरोधात आम्ही अपील केली होती. मात्र, केंद्रीय अनुशासन समितीलाही त्यावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही,' असे पत्रात म्हटले आहे.