महाराष्ट्र

maharashtra

...तर त्याचा समूळ नाश निश्चित! बलात्कारांच्या घटनांवर योगींनी सोडले मौन

उत्तर प्रदेशातील बलात्कारांच्या घटनानंतर देशातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. देशभरात आंदोलने सुरू आहेत. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

By

Published : Oct 2, 2020, 5:27 PM IST

Published : Oct 2, 2020, 5:27 PM IST

Updated : Oct 2, 2020, 5:38 PM IST

UP CM yogi adityanath
योगी आदित्यनाथ

लखनऊ - हाथरस आणि बलरामपूर सामूहिक बलात्काराच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशातील कायदा - सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. संपूर्ण देशात विरोधी पक्षांकडून आंदोलन पुकरण्यात आले असून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आज एक ट्विट केले आहे. 'उत्तर प्रदेशातील आयाबहिणींच्या स्वाभिमानाला धोका पोहचवण्याचा विचारही कोणी मनात आणला तर, त्याचा समूळ नाश निश्चित आहे. गुन्हेगारांना अशी शिक्षा मिळेल की, ज्यामुळे लोकांपुढे एक उदाहरण उभे राहील. उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कटीबद्ध आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हाथरस, बलरामपूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले असून योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. आज समाजवादी पक्षाचे नेते आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. उत्तर प्रदेशात जंगलराज पसरल्याचा आरोप काँग्रस नेत्यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शहरातील गांधी पुतळ्याकडे मूक मोर्चा घेऊन चालले होते. ढासळती कायदा सुव्यवस्था, महिलांविरोधातील वाढते गुन्हे, बेरोजगारी आणि नुकतेच मंजूर करण्यात आलेले कामगार आणि शेतीविषयक कायद्यांविरोधात समाजवादी पक्षाने सत्याग्रह पुकारला आहे. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यात अडविले. कार्यकर्ते मागे हटत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Last Updated : Oct 2, 2020, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details