आग्रा- उत्तरप्रदेशमधील आग्रा जिल्हाच्या बार कॉउंन्सिलच्या अध्यक्ष दरवेश यादव यांची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दरवेश यादव २ दिवसांपूर्वीच कॉउंन्सिलच्या अध्यक्ष बनल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्याजवळच्या मानल्या जाणाऱ्या वकीलावर हत्येचा आरोप लावण्यात आला आहे.
बार काउन्सिलच्या अध्यक्षाची न्यायालयाच्या आवारात हत्या; सहकारी वकिलानेच झाडल्या गोळ्या - आगरा
दरवेश यादव २ दिवसांपूर्वीच कॉउंन्सिलच्या अध्यक्ष बनल्या होत्या.
दरवेश यादव
याप्रकरणी काही उपस्थितांनी माहिती देताना सांगितले की, भर कार्यक्रमावेळी वकील मनीषने बंदुक काढत बार कॉउंन्सिलच्या नवीन अध्यक्ष दरवेश यादव यांच्यावर गोळीबार केला. यावेळी एक अन्य वकील या गोळीबारात जखमी झाला. गोळीबारानंतर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. सर्व लोक सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद केली असून तपास चालू आहे.