- युनोच्या (UNO) ताज्या अहवालानुसार, येत्या ३ दशकांमध्ये जगाची लोकसंख्या २०० कोटींनी वाढून ९७० कोटींचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे.
- या अहवालात २०२७ मध्ये भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पहिला क्रमांक लागेल, असेही म्हटले आहे.
- सध्या चीनची लोकसंख्या १४३ कोटी आहे. युनोच्या अंदाजानुसार, भारत आणखी ७ वर्षांत हा आकडा पार करेल. तसेच, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १६४ कोटींच्या पुढे जाईल.
- तथापि, संयुक्त राष्ट्रांच्या या आणि पूर्वीच्या काही अहवालांमध्ये तफावत आढळते.
- या जागतिक संस्थेच्या २०१५ च्या अहवालात 'भारताची लोकसंख्या २०२२ पर्यंत चीनच्या लोकसंख्येला मागे टाकेल,' असे म्हटले होते. तर, २०१७ च्या अहवालानुसार, २०२४ पर्यंत भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला होता.
- या आकड्यांवरून भारतात कुटुंबनियोजनाच्या योजना यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे लोकसंख्येच्या फुगवट्याला काही प्रमाणात आळा बसला आहे.
- २०५० पर्यंत भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येत आताच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झालेली असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातून देशासमोर 'आ' वासून उभ्या असलेल्या समस्यांवर उपाय करण्यासाठी अधिक चांगली धोरणे राबविण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
- मागील ९ वर्षांमधील माहितीचा अहवालावरून २७ देशांची लोकसंख्या एका टक्क्याने कमी झाल्याचे दिसत आहे.
- चीनची लोकसंख्याही २०५० पर्यंत कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र, भारताची लोकसंख्या २७ कोटींनी वाढेल. याचा अर्थ देशात गंभीर समस्या दडलेल्या असा होतो.
- वाढत्या जनतेला अन्न, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, इंधन आणि इतर पायाभूत सुविधा पुरवणे हे मोठे आव्हान आहे.
- वाढत्या लोकसंख्येमुळे नोकऱ्या-व्यवसायांच्या निर्मितीची मागणी वाढते. ग्रामीण जनतेचे शहरांकडे स्थलांतरण होण्यास सुरुवात होते. यामुळे योजनाबद्ध शहरीकरण आणि मानवी संसाधनांचे उत्पादनक्षम उपयोग आदी प्रश्न उभे राहतात.
- सतत वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या आणि मोठ्या शहरांवरील ताण वाढत जातो.
- याआधीच्या अंदाजांमध्ये २०५० पर्यंत ६८ टक्के लोकसंख्या राहात असेल, असे सूचित करण्यात आले आहे. तर, दिल्ली हे जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे शहर बनेल, असेही म्हटले आहे.
- दिल्लीमध्ये आधीच ३ कोटी लोक राहतात. पुढील ९ वर्षांत हा आकडा ३.७२ कोटींवर पोहोचेल.
- वाढत्या शहरीकरणाच्या आव्हावर मात करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपग्रह शहरांचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे.
- मागील काही वर्षांत शहरांचा चेहरामोहरा आमुलाग्र बदलेल, असे सूचित करण्यात आले आहे. तरुणांच्या वाढत्या संख्येला घरे, रस्ते आणि जीवनावश्यक वस्तू पुरवणे हे सरकारसाठी मोठे आव्हान बनणार आहे.
- वाढत्या जनतेला पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवणे सोपे राहणार नाही.
- स्वच्छता हे आणखी एक मोठे आव्हान असणार आहे. स्वच्छता राखण्यात अपयश आल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांना आमंत्रण मिळेल. आधीच बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विकृती निर्माण झाल्या आहेत. यामुळेही आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे.
- मोठ्या शहरांच्या आजूबाजूला उपग्रह शहरांचे बांधकाम करताना या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक ठरेल. पहिल्या कार्यकाळात मोदी सरकार स्मार्ट सिटीजची संकल्पना राबवली. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शहरांच्या नुतनीकरणाची संकल्पना येणे अपेक्षित आहे.
- भारतचा भूभाग ३२.८७ चौरस किलोमीटर्सचा आहे. अमेरिकेचा भूभाग भारताच्या भूभागाच्या जवळजवळ तिप्पट आहे. अमेरिकेची लोकसंख्या केवळ ३३ कोटी आहे. तर, भारताच्या लोकसंख्येने १२७ कोटींचा आकडा पार केला आहे.
- ऑस्ट्रेलियाचा भूभाग भारताच्या भूभागाच्या दुप्पट आहे. मात्र, तेथील लोकसंख्या केवळ २.५ कोटी आहे.
- भारताच्या अत्यंत दाट लोकसंख्या ही देशातील अनेक समस्यांचे मूळ आहे. पाणी, लाकूड, लोह आणि तांब्यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्ती झपाट्याने कमी होण्यास लोकसंख्या कारणीभूत आहे. तसेच, जमीनीची उत्पादन क्षमता आणि पृथ्वीचे हिरवे आवरण वेगाने कमी होत आहे.
- ज्या वेळी अन्न-धान्यांची मागणी वाढत आहे, त्याच वेळी शेतीतून येणारे उत्पन्न विविध कारणांनी घटत आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याकडे भारताची वेगाने वाटचाल - china
युनोच्या (UNO) ताज्या अहवालानुसार, येत्या ३ दशकांमध्ये जगाची लोकसंख्या २०० कोटींनी वाढून ९७० कोटींचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे.
युनो