महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण : पीडित कुटुंबाने लिहलेले पत्र लवकर का मिळाले नाही, सरन्यायाधिशांचा रजिस्ट्रीला जाब - उन्नाव सामूहिक बलात्कार

बलात्कार प्रकरणातील आरोपींकडून जीवाला धोका असल्याचे पत्र पीडितेच्या कुटुंबीयांकडून सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले होते. मात्र, १२ जुलैला देण्यात आलेले पत्र सरन्यायाधीशांना लवकर मिळाले नाही.

उन्नाव बलात्कार

By

Published : Jul 31, 2019, 11:01 AM IST

Updated : Jul 31, 2019, 7:32 PM IST

नवी दिल्ली- उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याच्या संशयामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पीडितेच्या कुटुंबीयांकडून सर्वोच्च न्यायालयाला सुरक्षेची मागणी करणारे पत्र लवकर मिळाले नाही. यावरून सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी न्यायालयाच्या रजिस्ट्रीला जाब विचारला आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपींकडून जीवाला धोका असल्याचे पत्र पीडितेच्या कुटुंबीयांकडून सर्वोच्च न्यायालयाला लिहले होते. मात्र, १२ जुलैला देण्यात आलेले पत्र सरन्यायाधीशांना लवकर मिळाले नाही. पत्र देण्यास उशीर का झाला ? यावर एका आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या रजिट्रीला दिले आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. तीन सदस्यीय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेचा अपघात झाला त्या रायबरेलीतील ठिकाणाला भेट दिली. सीबीआय पथकाकडून या अपघाताचा सखोल तपास सुरु आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेचा न्यायासाठी लढा

पीडितेच्या गाडीला अपघात झाला नसून घातपात असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधक आक्रमक झाल्याने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह १० जणांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आणखी २० जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, धमकावणे, संगनमत करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. यामध्ये अल्पवयीन पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. तर, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या पीडितेच्या काकूंसह आणखी एका नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे.

सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. पीडितेच्या आईने हा अपघात आपल्या मुलीला ठार करण्यासाठीच घडवून आणल्याचा आरोप केला आहे. घाकुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

Last Updated : Jul 31, 2019, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details