महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव पीडितेची प्रकृती गंभीर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना - उन्नाव घटना

उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार पीडितेची प्रकृती नाजूक झाली आहे. ९० टक्के भाजल्यामुळे  लखनौ सिव्हिल रुग्णालयातून पीडितेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

unnav case
पीडितेला रुग्णालयात नेताना

By

Published : Dec 5, 2019, 9:38 PM IST

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार पीडितेची प्रकृती नाजूक झाली आहे. ९० टक्के भाजल्यामुळे लखनौ सिव्हिल रुग्णालयातून पीडितेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. रुग्णालयात जलद पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. तसेच या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले
बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्यात आल्यानंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी तपासात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरिक्षक प्रवीण कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दोषींना शिक्षा देण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे, अशी माहिती प्रवीण कुमार यांनी दिली.
पोलीस महानिरिक्षक प्रवीण कुमार
या प्रकरणाच्या तपासासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस अधिक्षक दर्जाचा अधिकारी या पथकाचे नेतृत्त्व करणार आहे. लखनौ विभागाचे पोलीस आयुक्त मुकेश मेश्राम यांनी ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details