महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दोन्ही राजकुमारांना हवा विनाश, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंची राहुल, तेजस्वीवर अप्रत्यक्ष टीका - bihar assembly election 2020

पंतप्रधान मोदी यांनी खूप मोठे वक्तव्य केले. एकीकडे डबल इंजीनचे सरकार आहे, ज्यांना विकास हवा आहे आणि दुसरीकडे दोन राजकुमार आहेत, ज्यांना विनाश हवा आहे. जंगल राज असताना त्यांनी काय केले, हे सर्वांना ठाऊक आहे. आणि बिहारला परत जंगलराज व्हायचे नाही. अशी टीका चौबे यांनी केली.

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे
केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे

By

Published : Nov 1, 2020, 10:49 PM IST

पाटणा-बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. मते मिळवण्यासाठी नेतगण जनतेशी भेट घेत आहेत. आज निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा समारोप झाला. मात्र, नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक काही थांबलेली नाही. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे बरळले. त्यांनी पटना विमानतळावर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, दोन्ही राजकुमारांना विनाश हवा आहे, असे म्हटले.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे

पंतप्रधान मोदी यांनी खूप मोठे वक्तव्य केले. एकीकडे डबल इंजीनचे सरकार आहे, जिला विकास हवा आहे आणि दुसरीकडे दोन राजकुमार आहेत, ज्यांना विनाश हवा आहे. जंगल राज असताना त्यांनी काय केले, हे सर्वांना ठाऊक आहे. आणि बिहारला परत जंगलराज व्हायचे नाही. आपल्याला बिहारचा विकास करायचा आहे आणि एनडीएच बिहारचा विकास करू शकतो. हे दोन राजकुमार यमराजच्या घरी जातील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी केले.

काय म्हणाले होते पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीवर हल्लाबोल केला होता. एकीकडे बिहारमध्ये डबल इंजनची सरकार आहे, तर दुसरीकडे डबल-डबल राजकुमार आहेत. उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत जसे तिथल्या डबल राजकुमारांचे हाल झाले, तसेच हाल बिहारमध्येही होतील, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती.

हेही वाचा-साहिबगंजमध्ये महिलेने पाच मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले

ABOUT THE AUTHOR

...view details