महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, ३० मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रीमंडळाने १६ वी लोकसभा बरखास्त केली आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळीची बैठक झाली, यामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींचा राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द

By

Published : May 24, 2019, 6:26 PM IST

Updated : May 25, 2019, 12:47 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाने १६ वी लोकसभा बरखास्त केली आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळीची बैठक झाली, यामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवला आहे.

आज मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला. ३० मे ला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवार) एनडीएच्या सर्व घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. भाजपला ३०३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजप्रणित आघाडीला एकूण ३४८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे बहुमत आहे.

Last Updated : May 25, 2019, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details