नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकार -२ चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांकडेही विशेष लक्ष दिले आहे. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी 'नारी तू नारायणी' या योजनेची घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प: महिलांच्या सशक्तीकरणासाठी 'नारी तू नारायणी' योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकार -२ चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांकडेही विशेष लक्ष दिले आहे. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी 'नारी तू नारायणी' या योजनेची घोषणा केली आहे.
निर्मला सीतारामन
महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी एका कमिटीची स्थापनाही करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. ज्याद्वारे महिलांचे सशक्तीरण तसेच भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
ज्या महिलांकडे जनधन खाते आहे, त्या महिलांना ५ हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट मिळणार आहे. तसेच मुद्रा योजनेनुसार महिलांना १ लाख रुपयांचे कर्जही देण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगीतले.
Last Updated : Jul 5, 2019, 5:02 PM IST