नवी दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. वाचनालयात बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना पोलीस या व्हिडिओत दिसत आहेत. यावरून आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी पोलिसांवर टीका केली आहे.
'या घटनेतून दिल्ली पोलिसांचा क्रूरपणा समोर आला. असा कोणता कायदा आहे, तुम्ही(पोलीस) विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करता. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे, असे सिंह म्हणाले.