लंडन- गर्भधारणेदरम्यान आईपासून नवजात बाळाला कोरोना होणे असामान्य गोष्ट असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, मुलाचा जन्म, स्तनपान किंवा पालकांच्या संपर्कात आल्याने बाळांना संसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. बीजेओजी या इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनोकॉलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक बाळांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत.
गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाला कोरोनाचा संसर्ग? वाचा संशोधकांचे मत
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मातेपासून बाळाला होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सिझेरियन करणे, बाळाला जन्मताच आईपासून वेगळे ठेवणे तसेच स्तपान करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तर संशोधकांनी याबाबत वेगळे मत मांडले आहे. या विषयावरील 49 संशोधनांचा आढावा घेत पद्धतशीर विश्लेषण केले गेले आहे.

यात 666 नवजात बालके आणि 655 महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या मते, नॉर्मल डिलीवरी झालेल्या 292 महिलांपैकी केवळ 8 (2.7 टक्के) महिलांच्या बाळांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, 364 सिझेरियन झालेल्या महिलांतील 20 (5.3 टक्के) बाळांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या निष्कर्षांच्या आधारे संशोधकांनी असे म्हटले आहे, की नवजात बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग असामान्य आहे. याशिवाय संसर्ग झालेल्या बालकांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत.