महाराष्ट्र

maharashtra

कर्नाटक: माजी पंतप्रधान देवेगौडा आणि खर्गेंसह भाजपच्या दोन उमेदवारांची राज्यसभेवर एकमताने निवड

By

Published : Jun 12, 2020, 10:25 PM IST

र्नाटक विधानसभेचे सचिव एम. के विशलक्षी यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड जाहीर झाली. सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. देवेगौडा हे जनता दल सेक्यूलर पक्षाचे उमेदवार तर मलिक्कार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.

राज्यसभा निवडणुक कर्नाटक
राज्यसभा निवडणुक कर्नाटक

बंगळुरु -माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, वरिष्ठ काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे आणि इतर दोन भाजपच्या उमेदवारांची कर्नाटकातून राज्यसभेच्या चार जागांसाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजपचे अशोक गश्ती आणि इरणा कडाडी या दोन भाजपच्या नेत्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.

कर्नाटक विधानसभेचे सचिव एम. के विशलक्षी यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड जाहीर झाली. सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. देवेगौडा हे जनता दल सेक्यूलर पक्षाचे उमेदवार तर मलिक्कार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. तर इरणा कडाडी आणि अशोक गश्ती हे दोघे उमेदवार भाजपकडून असल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. निर्देशित केलेल्या उमेदवारांपैकी कोणीही अर्ज मागे घेतला नसल्याने सर्व उमेदवारांची एकमताने निवड झाल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.

77 वर्षीय वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे हे आपल्या राजकीय कारकिर्दीत कायम लोकांमधून निवडून जात होते. आत राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली आहे. 87 वर्षीय देवेगौडा यांना दुसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. 1996 साली पंतप्रधान झाले, तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खर्गे आणि गौडा या दोन्ही नेत्यांचा गुलबर्गा आणि तुमकूर मतदार संघातून पराभव झाला होता.

तर भाजपचे इराणा काकाडी आणि अशोक गश्ती हे काँग्रेस आणि जेडीयूच्या दिग्गज उमेदवारांच्या पुढे सर्वसामान्यच होते. मात्र, त्याच्या राजकीय कारकिर्दत चांगला संधी मिळाली आहे. दोन्हीही नेत्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले असून अनेक वर्षांपासून लोकांमध्ये मिसळून काम केले आहे. राज्याच्या नेत्यांनी सुचवलेली नावे मागे सारत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने गश्ती आणि काकाडी यांना राज्यसभेवर घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details