लखनौ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब लखनौ विमानतळावर दाखल झाले. तेथून ते अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौ विमानतळावर दाखल, अयोध्येच्या दिशेने रवाना - Uddhav thackeray news
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबासहीत लखनौ विमानतळावर दाखल झाले आहेत. ते अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौ विमानतळावर दाखल
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या स्वागताची संपूर्ण तयारी शिवसैनिकांनी केली आहे.