शोपियान - जम्मू-काश्मीर राज्यातील शोपियान जिल्ह्यात झालेल्या एनकाउन्टरमध्ये २ दहशतवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर : शोपियान एनकाउन्टरमध्ये पोलिसांकडून २ दहशतवाद्यांचा खात्मा - हिजबुल मुजाहिद्दीन
दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात. दोन्ही दहशतवाद्यांच्या शोपियान भागातील अनेक गुन्ह्यात हात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यापैकी एकाचे नाव मीर झीनत अल इस्लाम (राहणार, तुरकावांगम, शोपियान) आहे. तर, दुसऱया दहशतवाद्याला पाकिस्तानी कोडवर्डमध्ये मुन्ना असे म्हणत असल्याचे माहिती समोर आली आहे. दोघही हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात. दोन्ही दहशतवाद्यांच्या शोपियान भागातील अनेक गुन्ह्यात हात होता.
मीर झीनत याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अपहरण करुन स्थानिक नागरिकांची हत्या केल्याचे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुन्ना याचाही स्थानिक नागरिकांवर हल्ले करणे आणि दहशतवादी कारवायांत सहभाग होता. अरिहाल भागात सुरक्षा बलाच्या जवानांवर आयईडी ब्लास्ट केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या धमाक्यात २ जवानांना वीरमरण आले होते. यासोबत दोघेही स्थानिकांना दहशतवादाकडे वळण्यास प्रोत्साहन देत संघटनांमध्ये भर्ती करुन घेत होते.