महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्येत मशीदीला दिलेल्या पाच एकर जागेवर दोघी बहिणींचा दावा

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ही याचिका दाखल झाली असून ८ फेब्रुवारीला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. राणी कपूर आणि रामा राणी अशी याचिका दाखल केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत.

file pic
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Feb 4, 2021, 7:21 AM IST

लखनौ- रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन मशीदीसाठी देण्याचा निवाडा केला होता. त्यानुसार मशीदीसाठी अयोध्येत पाच एकर जमीनही देण्यात आली. मात्र, या जागेवर दिल्लीच्या दोन बहिणींनी दावा केला आहे. ही पाच एकर जमीन आमच्या मालकीची असल्याची याचिका त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली आहे.

८ फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता -

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ही याचिका दाखल झाली असून ८ फेब्रुवारीला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. राणी कपूर आणि रमा कपूर अशी याचिका दाखल केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत. त्यांचे वडील ग्यान चंद्रा पंजाबी भारताच्या फाळणीनंतर भारतात आले होते. त्यांना ही जमीन मिळाल्याचे दोघींचे म्हणणे आहे.

जागेचा वाद सुरू असताना मशीदीला जमीन दिली -

भारतात आल्यानंतर ते तत्कालीन फैजाबाद म्हणजेच आत्ताचे अयोध्या येथे स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांना या परिसरात २८ एकर जमीन जाझुल विभागामार्फत देण्यात आली होती. सुरूवातीला ही जमीन फक्त पाच वर्षांकरिता दिली होती. मात्र, नंतरही या जमीनीवर ताबा राहीला. त्यामुळे महसूल खात्याच्या दफ्तरात त्यांच्या नावाची नोंद केली गेली, असा दावा दोघी बहीणींनी केला. मात्र, पुढे जाऊन ग्यान चंद्रा पंजाबी यांचे नाव नोंदणीवरून काढून टाकण्यात आले होते. त्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, हा वाद मिटला नसतानाच सुन्नी वक्फ बोर्डाला यातील पाच एकर जमीन देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details