महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मंदिरातच दोन साधूंची निर्घृण हत्या, धारदार हत्यारासह नशेबाज युवक पोलिसांच्या ताब्यात - उत्तर प्रदेश समाचार

या शिवमंदिरातील साधूंचा चिमटा काही दिवसापूर्वी एका नशेबाज युवकाने चोरला होता. याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही साधूंनी या युवकाला जाब विचारला होता. तसेच, पुन्हा असे न करण्याबाबत बजावले होते. याच रागातून या युवकाने साधूची हत्या केली असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मंदिरातच दोन साधूंची निर्घृण हत्या, धारदार हत्यारासह नशेबाज युवक पोलिसांच्या ताब्यात
मंदिरातच दोन साधूंची निर्घृण हत्या, धारदार हत्यारासह नशेबाज युवक पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Apr 28, 2020, 8:03 PM IST

बुलंदशहर - जिल्ह्यातील अनुपशहर कोतवाली क्षेत्रांच्या अंतर्गत येणाऱ्या शिव मंदिराच्या परिसरात झोपलेल्या दोन साधूंची धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आपला चिमटा चोरल्याने या साधूंनी एका युवकाला झापले होते या नशेबाज युवकाने साधूंचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंदिरातच दोन साधूंची निर्घृण हत्या, धारदार हत्यारासह नशेबाज युवक पोलिसांच्या ताब्यात

हे दोन साधू या मंदिरात बऱ्याच काळापासून राहात होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या शिवमंदिरातील साधूंचा चिमटा काही दिवसापूर्वी या नशेबाज युवकाने चोरला होता. याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही साधूंनी या युवकाला जाब विचारला होता. तसेच, पुन्हा असे न करण्याबाबत बजावले होते. याच रागातून या युवकाने साधूची हत्या केली असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संशयावरून, पोलिसांनी या संशयित आरोपी नशेबाज युवकाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी या युवकाकडून धारदार हत्यार जप्त केले असल्याचेही सांगितले. सध्या दोन दोन्ही साधूंच्या मृतदेहाचे पंचनामे करून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. चिमटा चोरल्याने झापल्याच्या रागातून या युवकाने दोन्ही साधूंची हत्या केली, असे सिंह यांनी म्हटले आहे. मृतांपैकी एका साधूचे वय साधारण 55 वर्षे तर, दुसऱ्याचे वय 30 वर्षे होते.

ABOUT THE AUTHOR

...view details