राजकोट - ऑन-ड्युटी असताना राजकोट येथे कार्यरत असलेल्या २ पोलीस हवालदारांनी टिक-टॉक व्हिडिओ बनवला. पोलीस दलाने याप्रकरणी कारवाई करताना दोन्ही हवालदारांना निलंबित केले आहे.
पोलीस गाडीवर बसून टिक-टॉक व्हिडिओ केल्याप्रकरणी २ हवालदार निलंबित - व्हिडिओ
व्हिडिओत हवालदार अमित प्रागी गाडी चालवत आहेत. तर, हवालदार निलेश पुनाभाई हा व्हॅनच्या बोनेटवर बसला आहे. दोन्ही हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.
टिक-टॉक व्हिडिओ केल्याप्रकरणी २ हवालदार निलंबित
पोलीस निरिक्षक एन. के जाडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑन-ड्युटी असताना दोन पोलीस हवालदरांनी कंट्रोल रुम व्हॅनवर (पीसीआर) बसून टिक-टॉक व्हिडिओ केला आहे. व्हिडिओत हवालदार अमित प्रागी गाडी चालवत आहेत. तर, हवालदार निलेश पुनाभाई हा व्हॅनच्या बोनेटवर बसला आहे. हा व्हिडिओ दीड महिन्यांपूर्वी रामनाथ पॅरा पोलीस लाईन येथे बनवण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून दोन्ही हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.