महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट

मुसळधार पाऊस थांबावा यासाठी एका बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणला आहे.

बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट

By

Published : Sep 12, 2019, 11:31 PM IST

Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेश राज्यात नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुसळधार पाऊस थांबावा यासाठी एका बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणला आहे.

दोन महिन्यांपूर्वी राज्यात पाऊस पडत नव्हता, त्यामुळे लोकांनी दोन बेडकांचे लग्न लाऊन दिले. त्यानंतर योगायोगाने राज्यातील काही ठिकाणी खरोखरच मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे बेडूक विवाहामुळेच पाऊस पडला असून आता पाऊस कमी करण्यासाठी या बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणावा, अशी लोकांची धारणा झाली. त्यावर त्यांनी प्रतिकात्मक बेडूक आणि बेडकीनीचा विधिवतपणे घटस्फोट घडवून आणला आहे.

हेही वाचा -समुद्राच्या उधानामुळे देवगड तांबळडेग किनाऱ्याची मोठी धूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


एकीकडे भारताने चांद्रयान २ मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पाऊस पडावा यासाठी बेडकांचा विवाह लाऊन देण्याची पूर्वापार चालत आलेली अवैज्ञानिक प्रथा आजही काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details