महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खेळायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा गाडीत अडकल्याने गुदमरुन मृत्यू - dead

दोन लहान मुलांचा कारमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेलंगाणाच्या निझामाबाद येथील ही घटना आहे.

गुदमरुन मृत्यू

By

Published : Jul 24, 2019, 11:16 AM IST

Updated : Jul 24, 2019, 11:57 AM IST

हैदराबाद- खेळायला गेलेल्या दोन लहान मुलांचा कारमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेलंगाणाच्या निझामाबाद येथील ही घटना असून रिआज( वय 10) आणि मेहमुद (वय 5) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

चिमुकल्यांचा गुदमरुन मृत्यू

रिआज आणि मेहमुद घरापासून जवळ असलेल्या एका कारमध्ये खेळत होते. मात्र, कारचा दरवाजा लॉक झाल्याने या दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला. रिआज आणि मेहमुद घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. खुप शोधाशोध करुनही दोघे न सापडल्याने कुटुंबीयांनी रात्री उशीरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

एका स्थानिक व्यक्तीला कारमध्ये दोन मुले निपचीत पडले असल्याचे लक्षात आले. यावेळी कार मालकाला बोलावून कारचा दरवाडा उघडण्यात आला. पण तोपर्यंत रिआज आणि मेहमुद या दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, मुलांनी कारमध्ये प्रवेश कसा मिळवला. तसेच मुले खेळत असताना गाडी लॉक कोणी केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Last Updated : Jul 24, 2019, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details