महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दोन भारतीयांना पाकिस्तानी हद्दीत पकडले, परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप नाही प्रतिक्रिया - madhya pradesh

प्रशांत वैंदम आणि वरीलाल अशी त्या दोघांची नावे आहेत. प्रशांत हे हैदराबाद तर वरीलाल हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबरला या दोघांनाही अटक झाली.

पाकिस्तानात पकडलेले दोन भारतीय

By

Published : Nov 19, 2019, 7:17 AM IST

नवी दिल्ली - दोन भारतीय नागरिकांना अटक केल्याची पाकिस्तानी पोलिसांनी माहिती दिली आहे. बेकायदेशीररित्या पाकिस्तानी सीमेचे उल्लंघन करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोन्ही व्यक्तींकडे कुठलाही पासपोर्ट आणि व्हिसा आढळला नाही. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या बाहावलपूरमध्ये हे दोघे पकडले गेले.

प्रशांत वैंदम आणि वरीलाल अशी त्या दोघांची नावे आहेत. प्रशांत हे हैदराबाद तर वरीलाल हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबरला या दोघांनाही अटक झाली. राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवरील वायर (सीमारेषा) कधी कधी दिसत नाही. त्यामुळे इकडचे नागरिक तिकडे आणि तिकडचे इकडे येण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू


ऑगस्ट महिन्यात देखील पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत एका भारतीयाला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तीचे नाव राजू लक्ष्मण असे आहे. राजू हा भारताचा गुप्तहेर असल्याचा आरोप पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणाहून कुलभूषण जाधवला अटक करण्यात आली होती, राजूलाही तिथूनच अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details