स्थलांतरीत मजूरांना घेऊन निघालेला ट्रक पलटला; एकाचा मृत्यू, सहा जखमी.. - उत्तर प्रदेश जौनपूर ट्रक अपघात
11:58 May 15
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये स्थलांतरीत मजूरांना घेऊन जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे. यामध्ये एका मजूराचा मृत्यू झाला असून, सहा मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
राज्यात आज समोर आलेली ही तिसरी अपघाताची घटना आहे. सकाळीपासून जालौन आणि बहराइचमध्येही स्थलांतरीत मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकांचा अपघात झाला आहे. जालौनमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चौदा जखमी झाले आहेत. तर, बहराइचमध्ये झालेल्या अपघातातही एका मजूराचा मृत्यू झाला आहे.