महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये बंदुकांसह दारुगोळा घेऊन जाणार ट्रक पकडला, तीन दहशतवादी अटकेत - कलम ३७०

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शस्त्रसाठा घेऊन जाणारी ट्रक

By

Published : Sep 12, 2019, 12:40 PM IST

Updated : Sep 12, 2019, 2:39 PM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे आणि दारुगोळा घेऊन जाणारा ट्रक कठुआ पोलिसांनी पकडला आहे. ट्रकमधून चार AK -५६, दोन AK -४७, ६ मॅनझिन, १८० लाईव्ह राऊंड जप्त करण्यात आले आहे. तर तीन जैश -ए -मोहम्मदच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे.

या ट्रकला चौहोबाजूने झाकण्यात आले होते. ट्रकमधील मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दोन दिवसांपुर्वीच पोलीस आणि लष्कराने दहशतवादी संघटनेच्या ८ हस्तकांना पकडले होते. स्थानिक नागरिकांमध्ये पोस्टरद्वारे ते दहशत पसरवत होते. काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतरही भागात हिंसाचार घडवून आणण्यासाठी पाकिस्तान छुप्या पद्धतीने कट आखत आहे.

दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याबाबत माहिती मिळाल्याने देशाच्या किनारी भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून वातावरण आणखी पेटवण्याचा प्रयत्न करत आहे.

Last Updated : Sep 12, 2019, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details