हैदराबाद - लोकसभेत तीन तलाक विधेयकावरील मतदानादरम्यान टीआरएस पक्ष अनुपस्थित राहू शकतो असे तेलंगना राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने मागील वर्षी डिसेंबरमध्ये हीच योजना अवलंबली होती.
'लोकसभेत तीन तलाक विधेयकावरील मतदानादरम्यान टीआरएस राहणार अनुपस्थित'
लोकसभेत तीन तलाक विधेयकावरील मतदानादरम्यान टीआरएस पक्ष अनुपस्थित राहू शकतो असे तेलंगना राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी आम्ही तीन तलाक विधेयकाच्या चर्चासत्रात भाग घेतला होता. मात्र मतदानापासून दूर राहीलो होतो. यावेळेस देखील हेच केले जाऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. 'या विधेकाला विरोध केला तर काही समस्या निर्माण होतील आणि समर्थन केले तरी देखील समस्या निर्माण होतील', असे ते म्हणाले आहेत.
मागिल आठवड्यात शुक्रवारी केंद्र सरकारने लोकसभेत नवीन तीन तलाक विधेयक सादर केले होते. नरेंद्र मोदी यांच्या 2019 च्या दुसऱ्या कार्यकाळातील लोकसभेत सादर होणारे हे पहिले विधेयक आहे. लोकसभेत टीआरएसचे नऊ सदस्य आहेत. तर राज्यसभेत सहा सदस्य आहेत.