महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणा : माओवाद्यांकडून टीआरएस नेते नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण - कोठागुडेम

जवळपास १५ माओवाद्यांनी श्रीनिवास यांच्या घरावर हल्ला केला. माओवाद्यांकडे बंदुक आणि इतर शस्त्रे होती. माओवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण केले.

माओवाद्यांकडून टीआरएस नेते नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण

By

Published : Jul 9, 2019, 4:42 PM IST

हैदराबाद - तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण झाल्याची सुचना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कोठागुडेम भागातून माओवाद्यांनी श्रीनिवास राव यांचे अपहरण केले आहे.

माओवाद्यांकडून टीआरएस नेते नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण

सोमरात्री रात्री कोठागुडेम भागातील भद्रचलम गावात माओवाद्यांनी श्रीनिवास राव यांचे घरातून अपहरण केले. जवळपास १५ माओवाद्यांनी श्रीनिवास यांच्या घरावर हल्ला केला. माओवाद्यांकडे बंदुक आणि इतर शस्त्रे होती. माओवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत नल्लुरी श्रीनिवास राव यांचे अपहरण केले. पोलिसांनी अपहरण झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला असून तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details