महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणार? आज लोकसभेमध्ये चर्चा

प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्यामध्ये तत्काळ तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला गुन्हेगार समजण्यात आले आहे. तसेच अशा व्यक्तीला ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

तिहेरी तलाक विधेयक

By

Published : Jul 25, 2019, 10:29 AM IST

Updated : Jul 25, 2019, 12:10 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेमध्ये आज (गुरुवारी) विवादित 'तिहेरी तलाक' विधेयकावर चर्चा होणार आहे. भाजप सरकार विधेयक मंजूर करण्यासाठी आक्रमक असताना विरोधक मात्र, कायद्यावर आक्षेप घेत विरोध करण्याच्या पवित्र्यात आहेत.

आज गुरुवारी विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभा सदनामध्ये हजर राहण्याबाबचा व्हिप (आदेश) भाजपने सर्व खासदारांना जारी केला आहे. विधेयक लोकसभेमध्ये पारित झाले तरी बहुमताअभावी राज्यसभेमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकामध्ये तोंडी तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला गुन्हेगार समजण्यात आले आहे. तसेच अशा व्यक्तीला ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीला काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. विरोधकांसह भाजपचा सहकारी पक्ष जनता दलही या कायद्याच्या विरोधात आहे. पुढील चर्चेसाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्यामुळे समाजामध्ये लैंगिक समानता प्रस्थापित होणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. मात्र, बहुमताअभावी विधेयक राज्यसभेमध्ये बारगळले होते.

Last Updated : Jul 25, 2019, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details