नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थान 'शक्ती स्थळ' येथे अनेक नेत्यांनी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना आदरांजली; सोनिया, राहुल, मनमोहन सिंग उपस्थित - indira gandhi death anniversary
इंदिराजींनी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. त्या जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ दरम्यान पंतप्रधान होत्या त्यानंतर त्या १९८० मध्ये पुन्हा पंतप्राधन झाल्या. ३१ ऑक्टोबर १९८४ ला अकबर रोड येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्या दोन अंगरक्षकांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
'माझी आजी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त नमन करतो', असे राहुल यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यानिमित्त इंदिराजी पंतप्रधान असताना १९७१ ला पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. '१९७१ ला पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धादरम्यान इंदिराजींनी जबरदस्त नेतृत्वाचे उदाहरण स्थापित केले', असे ट्विट बॅनर्जी यांनी केले आहे. या युद्धानंतर पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली.