महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रांचीत मोदींच्या 'रोड शो' नंतर रस्ता शुद्धीकरण करण्याचा आदिवासी समाजाचा प्रयत्न - झारखंड न्यूज

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रांची येथे रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले होते. दरम्यान तेथे त्यांनी जनसभेला संबोधित केले होते. त्यावर आदिवासी संघटना सरना समिती यांनी विरोध दर्शवला आहे.

शुद्धीकरण करण्यासाठी जमलेले लोक

By

Published : Apr 25, 2019, 7:00 PM IST

रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झारखंडमध्ये ज्या रस्त्यावर 'रोड शो' केला होता, त्या रस्त्याचेच शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न काही आदिवासी संघटनांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना शुद्धीकरण करता आले नाही. मात्र, त्यांच्या या कृत्यानंतर खळबळ उडालेली आहे.

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रांची येथे रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले होते. दरम्यान तेथे त्यांनी जनसभेला संबोधित केले होते. त्यावर आदिवासी संघटना सरना समिती यांनी विरोध दर्शवला होता. तसेच बिरसा मुंडा आणि रस्त्याचे शुद्धीकरण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर स्थानिक प्रशासन सज्ज झाले होते.

प्रशासनाने बिरसा मुंडा चौकात कलम १४४ लागू केली होती. असे असतानाही सरना समितीचे अनेक सदस्यांनी चौकात गर्दी केली होती. त्यावेळी अनेक आदिवासी स्त्रियांच्या हातामध्ये पाण्याचे कलश होते. त्या कलशाने ते बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे शुद्धीकरण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

शुद्धीकरण करण्यासाठी जमलेले लोक

पोलिसांनी या कृत्याला केलेल्या विरोधामुळे काही वेळ सरना समितीचे सदस्य उग्र झाले होते. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. खूप वेळ लोकांची समजूत घातल्यानंतर ते शुद्धीकरण न करताच त्यांना परतावे लागले.

रांचीमध्ये भाजपचे सरकार आहे. मात्र, आदिवासी समाजाची जमीन विकणे किंवा खरेदी करणे या कायद्यामध्ये बदल करण्याचा या सरकारने प्रयत्न केला म्हणून या लोकांमध्ये संतापाची लाट आहे. तर पंतप्रधान मोदी या पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, असे सरना समितीचे म्हणणे आहे. पंतप्रधान यांनी रोड-शो केल्यांनरत अशा प्रकराची ही पहिलीच घटना आहे. गुरूवारी मोदी वाराणसी या आपल्या लोकसभा मतदार संघामध्ये रोड शो करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details