महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताचे नंदनवन पर्यटनासाठी खुले, 10 ऑक्टोबरपासून काश्मीरमधील निर्बंध हटवले - काश्मीरमधील पर्यटकांवरील निर्बंध हटवले

मलिक यांनी सोमवारी येथील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील स्थितीची माहिती घेऊन त्यावरही चर्चा केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सत्यपाल मलिक

By

Published : Oct 7, 2019, 11:46 PM IST

Updated : Oct 8, 2019, 12:02 AM IST

श्रीनगर -आर्टिकल 370 हटवण्याच्या आधीपासून काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांना तेथून तातडीने निघून जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आता 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना देण्यात आलेले मागे फिरण्याचे निर्देश हटवण्यात आले आहेत. तत्काळ प्रभावाने ही बाब लागू होणार आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटन सुरू होणार असून येथे पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळू शकते. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही माहिती दिली.

मलिक यांनी सोमवारी येथील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील स्थितीची माहिती घेऊन त्यावरही चर्चा केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मागील ६ आठवड्यांमध्ये येथील अनेक भागांमधील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. राज्यपालांनी आता राज्यातील स्थिती सामान्य पातळीवर आणण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. येथे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहने, लोकांच्या सुविधेसाठी २५ इंटरनेट कियोस्क सुरू करण्यात आले आहेत.

लोकांमध्ये येथे होणाऱ्या निवडणुकांविषयीदेखील उत्साह आहे. नजरकैदेत असणाऱ्या नेत्यांना पक्षातील इतर सदस्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Last Updated : Oct 8, 2019, 12:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details