नवी दिल्ली - देशभरामध्ये आत्तापर्यंत 24 हजार 942 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी 18 हजार 953 अॅक्टिव्ह केसेस असून 5 हजार 210 रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
भारतात कोरोनाचे 24 हजार 942 रुग्ण, तर 779 दगावले
गुजरात राज्यामध्येही आज दिवसभरात 256 रुग्णांची नोंद झाली. उत्तराखंड राज्यामध्ये एकही नवा रुग्ण दिवसभरात आढळून आला नाही.
तर मागील 24 तासांत 1 हजार 490 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात आज(शनिवार) दिवसभरात 40 रुग्णांची नोंद झाली. तर महाराष्ट्रात 281 रुग्ण आढळून आले. दिल्ली सरकारने कोरोनाचा जास्त प्रभाव नसलेल्या भागांमध्ये दुकाने सुरू ठेवण्यावरील निर्बंध हटवले आहेत. दिल्लीमध्ये कंन्टेनमेंट झोनची संख्या 95 झाली आहे.
गुजरात राज्यामध्येही आज दिवसभरात 256 रुग्णांची नोंद झाली. उत्तराखंड राज्यामध्ये एकही नवा रुग्ण दिवसभरात आढळून आला नाही. पंजाबमध्ये 10 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले.