- जळगाव -गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. आज एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी खालच्या स्तरावर राजकारण केल असून त्यांनी माझे जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ खडसे म्हणाले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सविस्तर वाचा-देवेंद्र फडणवीसांनी माझे जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला, एकनाथ खडसेंचा घणाघात
- नवी दिल्ली - केंद्र सरकारने दसरा दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. ३० लाख अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत घेतला. कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर'द्वारे(डीबीटी) हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत.
सविस्तर वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड.. मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस
- नवी दिल्ली -आयपीएलच्या ३८व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
सविस्तर वाचा-लोकेश राहुकडे 'ऑरेंज' तर, दिल्लीच्या गोलंदाजाकडे 'पर्पल' कॅप
- कोलंबो -भारतीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला पुढील महिन्यापासून सुरू होणार्या लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात भाग घेतील. एलपीएल ड्राफ्टमध्ये लीगच्या पाच फ्रेंचायझींनी जगभरातील खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले.
सविस्तर वाचा-लंका गाजवण्यासाठी 'हे' दोन भारतीय क्रिकेटपटू सज्ज
- उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल, मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मदत किती, कशी, कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होत आले असून आढावा घेणे सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणाच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सविस्तर वाचा-पंचनामे पूर्ण होत आले असून, लवकरच मदतीची घोषणा करणार - मुख्यमंत्री
- नवी दिल्ली -आजच्या पिढीमध्ये लग्नापूर्वी फोटोशूट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विविध भन्नाट कल्पना डोक्यात ठेऊन हे फोटोशूट केले जाते. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजीदा इस्लामनेही असे एक भन्नाट फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.