- नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर पोहोचली आहे. काल एका दिवसभरात झालेल्या वाढीनंतर, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ५२,९५२ वर पोहोचली आहे. यामधील ३५,९०२ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत १५,२६६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १,७८३ आहे.
सविस्तर वाचा :देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा; आतापर्यंत झालेत १,७८३ मृत्यू..
- मुंबई- कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाबाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला आहे.
सविस्तर वाचा :धक्कादायक! कोरोना मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार, सायन रुग्णालयातील प्रकार
- मुंबई- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 758 झाली आहे. बुधवारी राज्यात नवीन 1 हजार 233 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 275 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 94 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा :राज्यात नवीन 1233 रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या 16 हजार 758
- विशाखापट्टणम -आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना आज सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह आठ जणांचा यात मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील गावे रिकामी केली आहेत.
सविस्तर वाचा :विशाखापट्टणम वायू गळती LIVE : स्टायरीन वायूचा प्रभाव नाहीसा करण्यात यश, मुख्यमंत्र्यांनी घेतला घटनेचा आढावा..
- नागपूर- मध्यप्रदेशला नागपूरमार्गाने पायी जात असलेल्या एका मजुराच्या पत्नीची नागपुरात प्रसूती झाली आहे. भररस्त्यात प्रसूती कळा येताच अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावल्याने त्या महिलेची रुग्णालयात सुखरुप प्रसूती झाली आहे.
सविस्तर वाचा :लाॅकडाऊन: मुंबईहून उत्तरप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
- औरंगाबाद - शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. त्यामुळे पोलीस निरीक्षक राहत असलेल्या इमारतीमधील सुमारे ५० ते ६० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.